राजकीयसंपादकीय व लेख

खोदकामाच्या नावाने जनतेच्या पैश्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा

मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


यवतमाळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून पाईपलाईन, केबल टाकणे, भुयारी गटार अमृत योजना या सह इतर कामे सुरू आहे. परंतु या सर्व गोष्टी करतांना कुठेही कोणत्याही गोष्टीचे नियोजन प्रशासनाचे दिसत नाही.या सर्व गोष्टींचा नाहक त्रास यवतमाळ च्या जनतेला होत आहे. शहरातील स्थानिक बसस्थानक चौक, दत्त चौक, गोदनी रोड, पिंपळगाव , मेडिकल चौक परिसर या भागात मागील वर्षातच सर्व नवीन सिमेंट, डांबरी रस्त्याची कामे झाले. यावर जनतेचे करोडो रुपये खर्च करण्यात आले. परंतु नगरपालिका, जीवन प्राधिकरण व संबंधित यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे यवतमाळ कर जनतेच्या मेहनतीचे आणि हक्काचे करोडो रुपये या लोकांनी मातीत घातले. या प्रश्नावर मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणात चौकशी करून जबाबदार लोकांवर कडक कार्यवाहीची मागणी केली.
संबंधित ठेकेदार अथवा कंपनी ला यवतमाळ शहरातील फोडलेले रस्ते हे पूर्ववत करणे गरजेचे आहे. मात्र कोणत्याही फोडलेल्या रस्त्यांना पुनर्बांधणी करण्यात आली नाही. यवतमाळ शहरातील पिंपळगाव परिसरासाठी जवळपास १४ करोड रुपयांचा निधी रस्ते विकास कामांसाठी आणला. परंतु नव्याने तयार रस्ते पुन्हा भुयारी गटार करण्यासाठी फोडण्यात आले. स्थानिक दत्त चौक बसस्थानक परिसरात कित्येक वर्षानंतर सिमेंट रोड तयार करण्यात आला होता, तोही पाईप लाईन च्या कामासाठी फोडण्यात आला. ही सर्व कामे करतांना कोणत्याही विभागाचा परस्पर ताळमेळ दिसून येत नाही.जर या भागासह शहरात ही सर्व कामे प्रलांवित होती तर मग रस्ते करण्याची घाई का..? आणि केले तर लगेच ते फोडण्याची घाई का..?असा सवाल या प्रसंगी मनसेचे अनिल हमदापुरे यांनी केला. हा सर्व प्रकार चीड आणणारा आहे. यवतमाळकर जनतेचे अतोनात हाल सुरू आहे.शहरातील वाहतूक व्यस्थेचा बोजवारा उडाला आहे. खड्यांमुळे रोज अपघात होत आहे. ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी तर जनतेच्या पैश्याची उधळपट्टी सुरू तर नाही ना असा सवाल सर्व सामान्य यवतमाळकर विचारात आहे. यवतमाळ नगर पालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता असून राज्यातील महाविकास आघाडी मुंग गिळून विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. या पक्षाच्या लोकप्रतिनिधी ना जनतेच्या या पैशाचा हिशोब त्यांना जनतेच्या या पैश्यांचा हिशोब द्यावाच लागेल असे मत या प्रसंगी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यवतमाळ शहरातील सर्व फोडलेले रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत तसेच या सर्व भोंगळ कारभाराची चौकशी करूम संबंधित यंत्रणेच्या विरोधात जनतेचा पैश्याची उधळपट्टी केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून सोबतच पाईपलाईन चे काम करणाऱ्या कंपनी विरोधात कामात दिरंगाई केल्या प्रकरणी दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी मनसेने निवेदनातून केली आहे.संबंधित प्रकरणात तात्काळ कार्यवाही न झाल्यास मनसेच्या वतीने या विरोधात मनसेच्या पद्धतीने आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, नंदकिशोर नेहारे,निखिल वनकर, सुरेंद्र वैद्य, विकास पवार, अभिजित नानवटकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!