संपादकीय व लेख

अपघातात माजी सैनिक ठार

 

यवतमाळ : दुचाकी अपघातात माजी सैनिक ठार झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास बाभुळगाव मार्गावर घडली. किशोर भाऊराव जगताप (४७) रा. नेर असे मृतकाचे नाव आहे. किशोर जगताप हे सध्या भारतीय स्टेट बँकेच्या दारव्हा शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. सकाळी नेर- बाभूळगाव रोडवरअसलेल्या शेतात एम.एच. २९ बी जे ९८५८ क्रमांकाच्या दुचाीने गेले होते. दरम्यान सावंगा या गावाजवळ ते मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच नेरचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे, पोलीस कर्मचारी राजेश भगत, नरेंद्र लाहोरे, भारत पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!