पुसद नगर परिषद सभापती पदाची निवड

पुसद : नगर परिषदच्या विषय समिती सभापतींची निवड प्रक्रीया आज बुधवारी राबविण्यात आली. यामध्ये सर्व सभापतीची निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी एसडीओ डॉ. व्यंकट राठोड यांनी जाहिर केले.
पुसद नगर परिषदेवर राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व असून, नगराध्यक्ष अनिता नाईक ह्या आहेत. परंतु काही नाट्यमय घडामोडी मुळे राष्ट्रवादीचे सात सदस्य गैरहजर असल्याने शिवसेना आणि भाजपाला सभापतीपदाची लॉटरी लागली आहे. सभापती पदाची निवड प्रक्रीया आज बुधवारी राबविण्यात आली. उपाध्यक्ष व शिक्षण सभापती पदी डॉ. अकील मेमन, बांधकाम सभापती वहिदुनिसा मो.हारून, पाणी पुरवठा सभापती शिवसेनेचे उमाकांत पापीनवार, महिला व बाल कल्याण शितल उतळे यांची अविरोध निवड करण्यात आली. सभापती निवडीमध्ये अनेक बदल घडले असून, भाजपचे निरज पवार यांची नियोजन समिती सभापतीपदी निवड करण्यात आली तर भाजपाचे विरोधी पक्षनेते निखील चिद्दरवार काँग्रेसचे डॉक्टर मोहम्मद नदीम ,विष्णू शिकारे यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. तर भाजपाच्या शितल उतळे यांची महिला व बाल कल्याण सभापती अविरोध निवड करण्यात आली. आरोग्य सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अॅड. भारत जाधव तर भाजपाच्या रुपाली जयस्वाल यांच्यात काट्याची लढत झाली. यामध्ये दोन मताने अॅड. जाधव यांनी बाजी मारली. यावेळी एक नगरसेवक गैरहजर राहीला. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी एसडीओ व्यंकट राठोड, मुख्याधिकारी डाॅ. किरण सुकलवाड उपस्थित होते.