राष्ट्रीय मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन

नेर : पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळकृष्ण जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक पत्रकार संघाच्या कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा. सुरेश ढोके प्रा. सदाशिव नरोटे, गणेश राऊत इत्यादींचे प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गजानन काळे व मान्यवरांच्या उपस्थितीत दर्पनकार बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक सुरेश ढोके, प्राध्यापक सदाशिव नरोटे, साप्ताहिक लक्षभेदचे मुख्य संपादक अरुण राऊत, निलेश वाहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश ढोके प्रा. सदाशिव नरोटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव किशोर वंजारी, संघटक निलेश वाहने, उपाध्यक्ष संजय राऊत, कोषाध्यक्षपदी अरुण राऊत इत्यादींचे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन काळे यांनी केले. तर संचालन किशोर वंजारी यानी केले. तर आभार अशोक ईसाळकर यांनी मानले. यावेळी अध्यक्ष गजानन काळे, उपाध्यक्ष अशोक ईसाळकर, अरुण राऊत, निलेश वंजारी, नदीम खान, इत्यादींची उपस्थिती होती अशी माहिती संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख मोहन पापळकर यांनी दिली