महाराष्ट्रराजकीय

राज्यस्तरीय पत्रकाराची तीन दिवसीय कार्यशाळा

 

 

मुंबई : मुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभाग व सम्यक संस्था पुणे च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सक्षम पत्रकाराची तीन दिवसीय कार्यशाळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुबंई येथे नुकतीच पार पडली. प्रशिक्षणा दरम्यान पत्रकार दिन आल्याने खासदार सुप्रिया सुळे व आमदार अमोल मिटकरी यांनी प्रशिक्षण स्थळी येऊन पत्रकारास शुभेच्छा दिल्या. समाजाच्या हितासाठी पत्रकाराने झटण्याची अपेक्षा व्यक्त केली.

संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यशाळे करीता आलेल्या निवडक पत्रकारांच्या भावना लक्षात घेऊन सम्यकचे संचालक आनंद पवार यांनी पत्रकार दिनाचे आयोजन केले. त्यात खासदार सुप्रिया सुळे व आमदार अमोल मिटकरी यांनी केलेली पत्रकाराशी हितगुज महत्वाची ठरली. विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुबंई येथे साजरा झालेला पत्रकार दिन महाराष्ट्रातील उपस्थित पत्रकारांसाठी अविस्मरणीय ठरला. पत्रकार दिनानिमित्त पत्रकाराच्या समश्याची जाणीव राम खुर्दल यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून शासनाकडून पत्रकारासाठी उपाययोजनेची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विशाल बोरे यांचा वाढदिवस सम्यक परिवार व उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने साजरा करण्यात आला. प्रसंगी सम्यकचे संचालक आनंद पवार व त्यांचे सहकारी गौरी कुलकर्णी, पूजा, सुनीता गांधी, तेजश्री कुंभार, संदीप आखाडे, यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील दै विदर्भ कल्याणचे तालुका प्रतिनिधी महेंद्र देवतळे, आकाश बुर्रेवार, कलावंत संदेश लाळगे, प्रविण पथमासे, जयंत सोनोने, नयन मोंढे, भाष्कर फुलपगारे, श्रीकृष्ण बेडसे, अभिजित मोहिते, राजेश जोष्टे, विशाल बोरे, राहुल कुलट, आकाश धुमाळ, राम खुर्दल राहुल पाटील, युयुस्तु आर्ते, विनोद भोईर, प्रीतम पोतदार, पिनाक कोळी, अनिल पवार, राजलक्ष्मी केशरवाणी, नेहा कांबळे, पल्लवी भोगे, अर्चना येवले, जोत्स्ना सोमकुंवर आदी विदर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!