संपादकीय व लेख

अनाथपिंडक पतसंस्था म्हणजे कर्मचारी आणि समाजाचा सार्थ विश्वास ठरवा – डॉ. हर्षदीप कांबळे

 

 

यवतमाळ : भविष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर पैशासोबत लोकांचा विश्वास संपादन करणे अधिक महत्त्वाचे आहे. अनाथ पिंडक ची सर्व संचालक मंडळी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे. त्यामुळे अनाथपिंडक पतसंस्था म्हणजे कर्मचारी आणि समाजाचा सार्थ विश्वास असे समीकरण भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही.. असे विचार डॉ. हर्षदीप कांबळे सचिव तथा विकास आयुक्त (उद्योग) म. राज्य यांनी मांडले.अनाथपिंडक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन संजय गुजर उपाध्यक्ष अनाथपिंडक पतसंस्था यांनी केले. आवश्यकता पडेल तिथे पतसंस्थेला सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिले तर एक आदर्श पत संस्था कशी असावी.. पतसंस्थेच्या पदाधिकारी यांच्या जबाबदाऱ्या या विषयावर स्वागताध्यक्ष रमेश कटके यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर एम. देवेंदर सिंह जिल्हाधिकारी, रमेश कटके जिल्हा उपनिबंधक, विशाल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ. ओमप्रकाश नगराळे महिला व बालविकास अधिकारी विलास महाजन अध्यक्ष मजूर कामगार सहकारी संघ सामाजिक कार्यकर्ते कवडूजी नगराळे. पत संस्थेचे अध्यक्ष धम्मा कांबळे उपाध्यक्ष संजय गुजर सचिव राजेश गुर्जर खजिनदार राजेश जुनगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उद्घघाटकिय सत्राच्या प्रारंभी हरिदास अघम यांच्या मार्गदर्शनात प्रियदर्शी प्रस्तुत स्वरबहार या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मा कांबळे यांनी तर मुख्य सोहळ्याचे संचालन चंद्रबोधी घायवटे व स्वरबहार चे संचालन रुपेंद्र लोखंडे यांनी केले आभार रमेश गजबे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळ तथा निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व संचालक मंडळाने अथक परिश्रम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!