ब्रेकिंगसंपादकीय व लेख

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा; अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे

 

 

 

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रीया पार पडली. यामध्ये वणी विभागाचे टिकारामम कोंगरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत घुईखेडकर, शिवसेनेचे संजय देरकर यांची निवड करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकाधिक संचालक निवडून आले होते. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मनोहर नाईक, नागपूरचे माजी पालकमंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांनी अध्यक्षपदासाठी मनीष पाटील नावाचा आग्रह धरला होता. तर खासदार बाळु उर्फ सुरेश धानोरकर व वणीचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी टिकाराम कोंगरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. अखेर वणी विभागाला झुकते माप देण्यात आले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत टिकाराम कोंगरे यांची निवड करण्यात आली. तर शिवसेनेच्या कोट्यातून संजय देरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत घुईखेडकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी पालकमंत्री ना. संजय राठोड, माजी गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे, विधान परिषद सदस्य, आमदार तथा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग, माजी आमदार विश्वास नांदेकर, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,राजेंद्र गायकवाड, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अनिल गायकवाड यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!