पुसद येथे गावठी बॉम्बसह देशी कट्टा जप्त

पुसद (यवतमाळ): राज्यात गुन्हेगारी क्षेत्रात यवतमाळचे नाव कुप्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील पुसद येथे गावठी बॉम्बसह देशी कट्टा जप्त करण्यात आला. आज सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुसद येथे ही कारवाई केली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील पुसद हे शहर अतिसंवेदनशिल असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. या शहराचा पुर्व इतिहास बघता अनेक कारणावरून दंगलीच्या घटना घडल्या आहे. शहरातील एका इसमाकडे गावठी बॉम्ब व देशी कट्टा असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून आज सोमवारी पथकाने पुसद शहरातील एका इसमाच्या घरी धाड टाकली. घराची झडती घेतली असता देशी कट्टा व गावठी बॉम्ब जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी टोळी विरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख संतोष मनवर यांनी पुसद शहरात धाड टाकुन मोठ्याप्राणात देशी कट्ट्यासह शस्त्रसाठा जप्त केला होता हे विशेष!