ब्रेकिंगसंपादकीय व लेख

घरकुल लाभार्थाच्या खात्यातून काढले 26 लाख

 

यवतमाळ : उमरखेड नगर परिषद प्रशासनाने
घरकुल लाभार्थाच्या विट्रोलवर सह्या न घेता 90 लाभार्थींच्या खात्यातून परस्पर प्रत्येकी 29 हजार रुपये म्हणजे 26 लाख रुपये वळते केले आहे. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून पालिके समोर 17 डिसेंबर पासुन उपोषण सुरु केले आहे. यामध्ये प्रशासन व सत्ताधारी आंदोलकाची दिशाभूल करत आहे असा आरोप राहुल गांधी विचार मंचच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. प्राचार्य मीनाक्षी सावळकर यांनी केला आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उमरखेड शहरातील नागरिकांना घरकुल मंजुर करण्यात आले. मात्र 90 लाभार्थाच्या खात्यातून प्रत्येकी 29 हजार रुपये असे एकुण 26 लाख 10 हजार रुपये विट्राॅल करण्यात आले. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून पालिके समोर उपोषण सुरु केले आहे. या आदोलनाला 19 दिवस होवुनही कुठलाही तोडगा निघाला नाही. पंतप्रधान आवास योजने मध्ये कुठलेही पैसे नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालना मध्ये झालेल्या चर्चेत म्हटले ला आहे.तर प्रशासन उपोषणाला बसलेल्या लाभार्थीचे कोणते ही अटी मान्य न करता , फक्त पोकळ आश्वासने देत आहे. तसेच पत्रकार परिषदेमध्ये 2 कोटी 40 लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेच्या खात्यामध्ये जमा आहे असे सांगितले. मग लाभार्थीला पैसे का दिले नाही असा सवालही उपस्थित होते आहे. या प्रकरणाची चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राहुल गांधी विचार मंच आणि युवक कांग्रेस पार्टीने केली आहे. अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर प्राचार्य मीनाक्षी सावळकर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!