संपादकीय व लेख

सरत्या वर्षाला निरोप व नुतन वर्षाचे स्वागत घरी राहून करा

 

यवतमाळ, दि. 30 : कोविड – 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर रोजी 2020 या सरत्या वर्षाला निरोप व नुतन वर्ष 2021 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. शासनाच्या या मार्गदर्शक सूचना यवतमाळ जिल्ह्याकरीता लागू करण्यात येत आहे.
त्यानुसार कोरोनाच्या अनुषंगाने दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरीक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करावे. कोविड -19 या विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत नगर परिषद, नगर पंचायत, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, अशा सुचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिलेल्या आदेशात नमुद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!