ब्रेकिंग

31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊनला मूदतवाढ

 


यवतमाळ, दि. 30 : राज्यात कोरोना विषाणूमुळे कोविड – 19 उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे व या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे राज्यात साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी अधिसूचनेच्या दिनांकापासून सुरु करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव यांच्या 29 डिसेंबर 2020 अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात टाळेबंदीची (लॉकडाऊन) मुदत दिनांक 31 जानेवारी 2021 च्या मध्यरात्री पावेतो वाढविलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्याकरीता दिनांक 31 जानेवारी 2021 च्या मध्यरात्री पावेतो टाळेबंदीचा कालावधी वाढविण्याचे आदेश दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे यापूर्वीच्या आदेशानुसार निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना पुढील आदेशापर्यंत लागू राहील. सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार दंडात्मक कार्यवाही सुध्दा करण्यात येईल, असे आदेशात नमुद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!