ब्रेकिंगसंपादकीय व लेख

लाच स्विकारतांना ग्रामसेवक ताब्यात

 

यवतमाळ : प्लॉटचा गाव नमुना आठ अ व टॅक्स पावती नावाने करून देण्याकरीता तीन हजार रुपयाची लाच स्विकारतांना उमरखेड तालुक्यातील सुकळी जहागिर येथील ग्रामसेवकाला ताब्यात घेतले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज मंगळवारी उरखेड पंचायत समितीच्या गेटजवळ केली.
अमोल रामराव चव्हाण (४१) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. उमरखेड पंचायत समिती कार्यालयात ग्रामविकास विभागात ते कार्यरत आहे. सुकळी येथील शेतक-याने विकत घेतलेल्या प्लॉटचा गाव नमुना आठ अ व टॅक्स पावती नावे करून देणेकरिता अमोल चव्हाण, ग्रामसेवक हे पाच हजार रुपये लाच मागीत असल्याबद्दल तक्रार लाचलुचपत प्रतिबंधीत विभागाकडे प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी आज २९ डिसेंबर रोजी केली. यावेळी सदर ग्रामसेकवाने ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावरून उमरखेड पंचायत समितीच्या मुख्य गेट जवळील चहा कॅन्टीन समोर सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष ग्रामसेवकाने ३ हजार रुपये लाच स्वीकारली. यावेळी दबा धरुन बसलेल्या अधिका-यांनी ग्रामसेवकाला रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्राचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक गजानन पडघन, पोलीस उपअधिक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, किरण खेडकर, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे पोशि महेश वाकोडे, सचिन भोयर, राहुल गेडाम यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!