जिल्हा पोलीस दलातील १८६ पोलीस कर्मचा-यांना कोरोना

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना तैनात करण्यात आले होते. लॉकडाउनच्या काळात जिल्हा पोलीस दलातील १८६ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी सर्वच कर्मचा-यांनी कोरोनावर मात केली असून, सद्या ११ जण कोरोनाबाधीत आहे.
देशात मार्च २०२० मध्ये कोरोनाचे थैमान वाढले होते. कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना सुरू केली. मार्च महिन्यात च संपुर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले. जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. विदेशासह महानगरातून परत आलेल्या नागरिकांना शोधुन त्यांची कोरोनाची चाचणी करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस व अन्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांची ड्युटी लागली होती. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनाही तैनात करण्यात आले होते. दरम्यान जिल्हा पोलीस दलातील १८६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना कोरोनाची लागन झाली होती. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी कोरोनावर मात केली असून, ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहे. पोलीस कल्याण निधीमधून ८ पोलीस कर्मचा-यांना प्रत्येकी एक लाख रुपये उपचार करण्यासाठी दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.
दोन अंमलदाराचा मृत्यू
कोरोनाच्या काळात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोन अंमलदारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान दोन अंमलदारांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुुंंबातील सदस्यांना अनुकंपामधुन पोलीस दलात सेवा करण्याची संधी देण्यात येणार आहे. आगामी पोलीस भरतीमध्ये त्यांना प्राध्यान्य देण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.