संपादकीय व लेख

इफको टोकीयो विमा कंपणीला हद्दपार करा- खासदार भावना गवळी

 

 

यवतमाळ : साडे चार लाख शेतक-यांचे तसेच सरकारचे पैसे इफको टोकीयो कंपणीने हडप केले. आता मात्र नियमांवर बोट ठेऊन शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शेतक-यांवरील अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. आता राज्य सरकारने विम्याचे काम स्वताकडे घ्यावे तसेच या कंपणीला हद्दपार करावे असे प्रतिपादन आज खासदार भावनाताई गवळी यांनी केले. त्या आज यवतमाळ येथे आयोजित जबाब दो आंदोलनात बोलत होत्या.

अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्हयातील शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. कापूस, सोयाबिनचा तर लागवड खर्च सुध्दा निघाला नाही. अशा परीस्थितीत पिकविमा कंपण्यांनी बोटावर मोजण्याइतक्याच शेतक-यांना पिकविमा दिला. त्यामुळे आज दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्टेट बॅंक चौक येथील इफको टोकीओ कंपणीच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. या जबाब दो आंदोलनात हजारो नागरीक, शेतकरी तसेच सर्व सामाजिक, शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला. स्टेट बॅंक चौकात खासदार भावनाताई गवळी यांनी शेतक-यांना संबोधित केले. कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार सरसकट शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. टाळाटाळ केल्यास ही लढाई न्यायालयात तसेच संसदेत नेणार असल्याचे सुध्दा त्यांनी सांगीतले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी आम्हाला दिलेल्या शिकवणीचे पालन करीत आम्ही शेतक-यांची लढाई लढत आहो. तुमच्यासारखे सर्व भाऊ माझ्या पाठीशी असल्यामुळे मी मागे हटणार नाही. गाठ शिवसेनेशी आहे हे इफको टोकीयो कंपणीने विसरु नये असा इशारा सुध्दा सरटेशेवटी भावनाताई गवळी यांनी दिला. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा, शेतकरी नेते अशोक भुतडा, सुरेश गावंडे, हभप गुलाबराव महाराज, दारुबंदी आंदोलनाचे महेश पवार, शेतकरी नेते श्री. घाडगे, यांनीही शेतक-यांना संबोधित केले. या आंदोलनात बाबु पाटील जैत, उपजिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार, राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे, वणीचे सुनिल कातकाडे, बाभुळगाव तालुका प्रमुख वसंता जाधव, नितीन माकोडे, मंदाताई गाडेकर, लताताई चंदेल, यवतमाळ शिवसेना शहर प्रमुख पिंटु बांगर, यवतमाळ मध्यवर्ती बॅंकेचे संचालक स्नेहल भाकरे, गुणवंत ठोकळ, अतुल गुल्हाणे, शैलेश डहाके, डॉ. प्रसन्न रंगारी, रुषी इलमे, भूषण काटकर तसेच मोठया संख्येत शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

भावनाताई गवळी यांचा संताप

स्टेट बॅंक चौकातून शेतक-यांचा मोर्चा इफको टोकीयो कंपणीच्या कार्यालयावर धडकला. याठिकाणी कंपणीच्या कार्यालयात खासदार भावनाताई गवळी यांच्यासोबत विमा कंपणीच्या अधिका-यांची बैठक झाली. विमा कंपणीचे अधिकारी नियमावर बोट ठेऊन टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने भावनाताई गवळी यांनी टाळाटाळ खपवून घेणार नाही असे सांगत आपला संताप व्यक्त केला.

शिवसैनिकांचा संताप अनावर

विमा कंपणीचे अधिकारी भावनाताई गवळी यांची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेचे पदाधिकारी भडकले. यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी खिशातून सोयाबिन काढून विमा कंपणी व्यवस्थापक सचिन सुरोशे यांच्या अंगावर फेकले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत शांतता कायम केली. या घटनेने विमा कंपणीच्या अधिका-यांना सुध्दा शेतक-यांना मदत न मिळाल्यामुळे शिवसैनिकांत असलेला आक्रोश बघायला मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!