क्रीडा व मनोरंजन

स्वप्नील ढवळेने संगीतकार व ड्रमर म्हणून बनविली ओळख

 

महेद्र देवतळे : घाटंजी
…………………………
प्रेक्षक होण्यापासून ते कलाकार होण्यापर्यंतचा प्रवास स्वप्नील ढवळे साठी तितकासा सोपा नव्हता. पारंपारिक करियरपेक्षा वेगळ्या क्षेत्राची निवड करणे ही सर्वात कठीण गोष्ट होती. ज्या समाजामध्ये स्वप्निल जन्म घेतला तो समाज व आईवडिलांनी स्वप्नील कडून पाहिलेले स्वप्न यात विभवांतर असल्यामुळे स्वप्नीलने स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले व त्यात तो यशस्वी सुद्धा झाला. आजमितीस स्वप्निलच्या यशामुळे त्याचा पुराणमतवादी समाज व त्याचे आई-वडील त्याच्या यशावर अभिमान व गर्व करतांना दिसून येत आहे.

स्वप्निल ढवळे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत केलेल्या चर्चेत त्यांनी सांगितले की, माझा समाज खूप पुराणमतवादी आहे. पारंपारिक करियर वरच विश्वास ठेवतो. त्याला आठवते, जेव्हा तो लक्षपूर्वक गायन, रियलिटी शो पाहायचो तेव्हा एक वेगळी भावना त्याच्या मनात यायची, की कधीतरी आपल्याला सुद्धा स्टेजवर जायचय. त्यामुळे तो वडिलांच्या परवानगीशिवाय संगीत शिकवणीला जात असे आणि त्याची आई त्याचा वडिलांना कळू न देता फीज भरायची. पण ते संघर्षाचे दिवस होते. म्हणून त्याच वाईट वाटत नाही. त्यानी सांगितले की, तो दहावीत शाळेत अव्वल आला होता. त्यामुळे वडिलांची त्याझ्याकडून खूप अपेक्षा होती. ती ही की त्याने चांगली नोकरी करावी. १२ वी नंतर अभियांत्रिकी ला प्रवेश करण्याचे ठरले होते. पूणे येथे गेल्यानंतर संगीताच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्याने एक वाद्य शिकण्याचा निर्णय घेतला. संगीत अकादमी मध्ये ड्रम शिकण्यास त्यास सुरुवात केली.
घाटंजी सारख्या आदिवासी बहुल भागात संगीत क्षेत्राला कोणत्याही गोष्टी उपलब्ध नसताना जिद्दीने स्वप्नीलने महाविद्यालयीन काळापासूनच त्यांनी लाइव्ह शो करणे सुरू केले. पदवीनंतर त्यांनी दोन वर्षे नोकरी केली. एकाच वेळी संगीत आणि नोकरी दोन्ही हाताळणे कठीण झाले. त्यामुळे संगीत क्षेत्रात पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील या निर्णयाच्या विरोधात होते. त्यांना पटवून देणे खूप कठीण होते. संगीताद्वारे पैसे कमावण्याचे कोणते मार्ग आहेत याबद्दल पावर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवावे लागले. तेव्हा त्याची जिद्द पाहून वडिलांनी होकार दिला. त्यानंतर त्यांने ट्रू स्कूल ऑफ म्युझिक मुंबई येथे दोन वर्ष संगीत शिक्षण घेतले. त्याची परिचिती म्हणून आज स्वप्नील ढवळे हा एक संगीतकार आणि ड्रमर असून तो संगीत उद्योगासाठी मुंबईला कार्यरत आहे. अलीकडेच फ्रेन्डषीप डे निमित्याने त्याने ‘याराणा’ नावाचे एक गीत रिलीज केले. ज्या गाण्याचे वितरण सुप्रसिध्द कंपनी ‘टिप्स म्युझिक’ च्या माध्यमातून होत आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय.एव्हढेच नाही तर स्वप्नील ढवळे याने गाण्याचे लेखन आणि गाणं संगीतबद्ध केलं, गाण्याला आवाज दिला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक मंदार देशपांडे यांनी, ज्यांनी विक्की कौशलच्या ‘जुबान’ सारख्या चित्रपटासाठी सुद्धा काम केले असून अनेक मराठी अल्बम्स गायले आहेत. गाण्याची पटकथा आणि दिग्दर्शन हर्षल गवळीने उत्तम रीतीने केली आहे. गाण्याचे प्रदर्शन २ ऑगस्ट ला मैत्री दिनानिमित्ताने करण्यात आले. टिप्स म्युझिकच्या व्हॉल्युम या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. गाणं ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या मित्रांची आणि जुन्या दिवसांची नक्की आठवण येईल अशी खात्री स्वप्नील ने व्यक्त केली. विशेष म्हणजे हा पूर्ण प्रयोग लॉकडाऊन च्या काळात केला आणि नवनवीन पद्धत वापरून हे गाणे पूर्ण केले. तुम्हालाही हा प्रयोग बघायला नक्की अशी आशा त्याने व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!