ब्रेकिंगविदर्भ

जवाब दो आंदोलनात शिवसैनिकांने पकडली जनरल मॅनेजरची कॉलर

 

यवतमाळ : शेती पिकाचे नुकसान होवूनही अनेक शेतकरी पीक विम्या पासून वंचित आहे. पीक विमा काढलेल्या सर्व शेतक-यांना मदत देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात आज सोमवारी जवाब दो आंदोलन करण्यात आले. दरम्यान शिवसैनिक संतोष ढवळे यांनी पीक विमा कंपनीचे जनरल मॅनेजर सचिन सुरोसे यांच्यावर प्रश्नचा भडीमार करून कॉलर पकडली. खा. भावळा गवळी व पोलीस अधिका-यांसमोर हा प्रकार घडला.

यवतमाळ जिल्ह्यातील साडेचार लाख शेतक-यांनी पीक विमा काढला. प्रत्यक्षात ९ हजार ५०० शेतकर-यांना भरपाई मिळाली आहे. इतर शेतक-यांना सरसकट पीक विमा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांना पीक विमा काढण्यात यावा या मागणीसाठी आज सोमवारी खा. भावना गवळी यांच्या नेतृत्वात जबाव दो आंदोलन करण्यात आले. यावेळी स्टेट बँक चौकात सभा घेण्यात आली. त्यानंतर खा. गवळी व शिवसेना पदाधिका-यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय गाठले. यावेळी खा. भावना गवळी यांनी जनरल मॅनेजर सचिन सुरोसे यांना निवेदन दिले. दरम्यान शिवसैनिक संतोष ढवळे यांनी जनरल मॅनेजर सचिन सुरोसे याच्यासोबत संवाद साधून सोयाबिन व कापूस केवढा असतो अश्या प्रश्नाचा भडीमार केला. त्यानंतर मॅनेजरच्या अंगावर सोयाबिन फेकुन कॉलर पकडली. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी शिवसैनिकांना तेथून बाहेर काढले. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!