विदर्भ

महापुरुषांच्या विचाराने नेर अर्बनची यशस्वी वाटचाल- नरेंद्र गद्रे

 

 

यवतमाळ : छत्रपती शिवराय , राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज , भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा बसवेश्वर या महापुरुषांच्या विचारांचा अंगिकार केल्यामुळे नेर अर्बनची यशस्वी वाटचाल होत असल्याचे मत सामाजिक अभियंते तथा नेर अर्बनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गद्रे यांनी केले.
नेर अर्बन यवतमाळ शाखेचा वर्धापणदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी गद्रे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक भानुदास कान्हारकर, वास्तू शिल्पकार जगदिश जांगिड, शाखा व्यवस्थापक सुहास नागठाणे, पुणे येथील विपणन सल्लागार गणेश सपकाळ, उमेश डोके, प्रकाश ठाकरे आदिंची उपस्थिती होती.
व्यवस्थापक सुहास नागठाणे यांनी ठेवी २८ कोटी ५२ लाख ८९ हजार असून मुदत ठेव २९ कोटी आहेत. जनतेच्या पाठिंब्यामुळे आम्हाला यश मिळत असल्याचे नमूद केले.
यावेळी कोरोना महामारीच्या काळात यवतमाळ शाखेचे जनता ठेव प्रतिनिधी ज्ञानेश्वर आसुटकर यांनी ‌आपली कार्यक्षमता सिध्द करीत ६० लाख वसुली केल्याबद्दल नरेंद्र गद्रे यांच्या हस्ते नेर अर्बन यवतमाळ शाखेचे कोविड योध्दे म्हणून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत लोहकरे यांनी केले. संचालन सोनल वानखडे यांनी तर आभार विनोद बुरबुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाखा व्यवस्थापक व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!