९०० ग्रॅम वजन असलेल्या ६० दिवसांच्या बाळावर शस्त्रक्रिया I Surgery on a 60 day old baby weighing 900 grams
हृदयात दोष असणाºया बाळाला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये जीवनदान
delivery
मुंबई : नियतीचा खेळ अनोखा असतो. याचा प्रत्यय नुकताच आला. अपघातात एका मातेने १२ वर्षांचे मूल अपघातात गमावले. या घटनेनंतर वयाच्या ५० व्या वर्षी त्या महिलेच्या वाट्याला पुन्हा माता बनण्याचा योग्य आला आणि महिला व तिच्या कुटुंबियांच्या वाट्याला आनंदाचा क्षण आला. मात्र या आंनदावर पुन्हा दु:खाची सावली पडली. वेळेपूर्वी महिलेची प्रसूती झाली. जन्मला आलेल्या बाळ गणेशचे वजन अवघे ९०० ग्रॅम होते. त्यात जन्माजात हृदयात दोष असल्याचे जीवाला धोका निर्माण झाला. जन्मानंतर २० तासांच्या आत बाळ गणेशच्या हृदयावर उपचार सुरू झाले. उपचारादरम्यान गणेश ६७ दिवसांचा होताच कोकिलाबेन धीरूभाई अंबानी (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) हॉस्पिटल (कोकिलाबेन हॉस्पिटल) येथे ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून गणेशलाा नवजीवन दिले.
वेळेआधीच प्रसूती…
वेळेआधी प्रसूती झालेल्या या बाळाचे वजन फक्त ९०० ग्रॅम होते. डॉक्टरांनी सुधारात्मक शस्त्रक्रियेची योजना आखली आणि बाळाचे वजन थोडेतरी वाढेपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. तथापि जन्मानंतर अवघ्या २० तासांत आॅक्सिजनच्या पातळीत गंभीर घट झाल्याने बाळाची प्रकृती झपाट्याने खालावली. त्यामुळे हृदयाचे दोष तात्पुरते व्यवस्थापित करण्यासाठी कमीत कमी तीव्रतेची बलून सेप्टोस्टॉमी ही आपत्कालीन उपचार प्रक्रिया केली गेली.
गर्भामध्ये हृदय दोष असण्याची शंका I Suspicion of heart defect in fetus
गर्भामध्ये हृदय दोष असण्याची शंका आल्यामुळे गभर्धारणेच्या पहिल्या तिमाहीतच आईला कोकिलाबेन रुग्णालयात पाठवण्यात आले होते. गर्भाच्या इकोकाडिर्योग्राफीमध्ये असे दिसून आले की विकसीत होत असलेल्या गर्भामध्ये ट्रान्सपोझिशन आॅफ द ग्रेट आटर्रीज (टीजीए) आहे. हा एक प्रकारचा सायनोटिक (रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होणे) हृदय दोष आहे. यामध्ये हृदयातून रक्त फुफ्फुसात आणि शरीरात वाहून नेणाºया दोन मुख्य धमन्या म्हणजेच मुख्य फुफ्फुसीय धमनी आणि महाधमनी या योग्यरित्या जोडलेल्या नसतात किंवा त्यांच्या जागा हललेल्या असतात.
कोकिलाबेन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये ८६ दिवस निरिक्षणाखाली
Under 86 days of observation at NICU of Kokilaben Hospital
दोन महिन्यांचे बाळ गंभीर आजारी पडले आणि त्याच्यावर ताबडतोब शस्त्रक्रियेची गरज होती. बाळाचे वजन फक्त दीड किलो असूनही बाळाचा जीव वाचवण्यासाठी आर्टेरिअल स्विच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. कमी वजनामुळे सदर शस्त्रक्रिया अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीची होती. त्यात बाळाचे कमी वजन आणि वय हे मोठे आव्हान होते आणि त्याच्या वेळेपूर्व प्रसूतीतून झालेल्या संसर्गामुळे या गुंतागुंतीत आणखी भर पडली होती. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सामान्यत: जेव्हा बाळांचे वजन किमान २ किलो असते तेव्हा केल्या जातात. कोकिलाबेन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये ८६ दिवस निरिक्षणाखाली राहिल्यावर आणि बाळाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधार पडल्यावर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.