कांजुर मार्ग परिसरात खून करणारे दोघे गजाआड
हवालदार दीपक पवार यांच्यामुळे गुन्ह्याचा २४ तासात उलगडा

मुंबई : इडली खाण्यासाठी गेलेल्या तरुणांमध्ये झालेल्या वादातून दोन जणांनी एकाचा खून केला. या धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा अवघ्या २४ तासात करण्यात आला. हवालदार दीपक पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट ७ च्या पोलिसांनी खून करणाऱ्या दोन्ही आरोपींना गजाआड केले.
२० जून रोजी कांजूर मार्ग पश्चिम परिसरातल्या हुमा मॉलजवळ रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास निखील झोरे (वय २६) हा इडली खाण्यास गेला. त्यावेळी तेथे दोन जण तेथे आले. दरम्यान त्या दोघांचा निखील सोबत वाद झाला. बाचाबाचीत राग अनावर झाल्याने त्या दोघांनी निखीलवर चाकूने वार केले. या हल्ल्यात छातीवर वार झाल्याने निखील रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला. हल्ला करून त्या दोघांनी तेथून पळ काढला.
दरम्यान, खून झाल्याची माहिती प्राप्त होताच पार्कसाईट पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध (गु.र.क्र. ३८७ / २०२२) भादंवि कलम ३०२, ३४ सह भरतीय हत्यार कायदा कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पार्कसाईट पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष (युनिट ७) ७ चे पोलीस देखील करू लागले. तपासादरम्यान हवालदार दीपक पवार यांना खबऱ्याने आरोपींची माहिती दिली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीच्या पंतनगर येथून तर दुसऱ्याच्या भांडुपमधून मुसक्या आवळल्या. या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पार्कसाईट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कौतुकास्पद कारवाई करणारे युनिट ७ चे पथक…
ही बातमीही वाचा…
List of Mumbai Police Commissioners in marathi | मुंबई पोलीस आयुक्तांची यादी 2022